Animal health 2025 गाई आणि म्हशींच्या लसीकरणाची महत्त्वाची माहिती

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Animal health गाई आणि म्हशींच्या प्रमुख आजारांवर लसीकरणाची महत्त्वाची माहिती. यामध्ये घटसर्प, फर्‍या, फाशी, लाळ्या खुरकुत आणि लंपी यांसारख्या आजारांवर योग्य लसीकरण कधी करावे याबद्दल जाणून घ्या.

पशुपालकांना त्यांच्या जनावरांचा आरोग्यदृष्ट्या चांगला ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे रोग आणि त्यावरील लसीकरणाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. जनावरांच्या स्वास्थ्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचे आहे, कारण हे आजार होऊच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कार्य करते.

Animal health

👉सविस्तर माहितीसाठी क्लिक करा👈

महत्त्वाचे आजार आणि त्यावरील लसीकरण:

  1. घतसर्प
    • घटसर्प हा जिवाणूजन्य आजार आहे जो पावसाळ्यात जास्त प्रमाणात पसरतो. या आजाराची लक्षणं दिसण्याआधीच जनावरं दगावू शकतात. यासाठी, गाई आणि म्हशींना एप्रिल – मे महिन्यात लस दिली पाहिजे. संकरित गाईंना वर्षातून दोन वेळा लस द्यावी.
  2. फर्‍या
    • फर्‍या हा आजार सहसा सहा ते 24 महिने वयाच्या जनावरांमध्ये जास्त दिसतो. यामध्ये जनावरांच्या माने, पाठीवर आणि पायावर सूज येते आणि ते लंगडू लागतात. यासाठी एप्रिल – मे महिन्यात एक वेळ लस दिली पाहिजे.

हे ही पाहा : घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबरी: सरकार देणार पाच ब्रास वाळू मोफत!

  1. फाशी
    • फाशी या आजारामध्ये जनावरांना लक्षणं दिसण्याआधीच तडकाफडकी मृत्यू होतो. या आजारावरची लस मे महिन्यात एक वेळ दिली पाहिजे, खास करून ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव आहे, त्या भागातील जनावरांना.
  2. लाळ्या खुरकुत
    • हा एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे, ज्यामुळे एकाच वेळी अनेक जनावरांना तो लागू शकतो. यासाठी, लस मार्च आणि सप्टेंबर महिन्यात दोन वेळा द्यावी. जर जनावरांच्या रोगप्रतिकारशक्तीला वर्षभर टिकवायचं असेल, तर सप्टेंबर महिन्यात एक वेळ लस द्यावी. Animal health

👉लाडक्या बहिणींना खुशखबर! फेब्रुवारी-मार्च हप्ता एकत्र, पहा 3000 येणार की 4200?👈

  1. लंपी
    • गाईंना लंपी या आजाराची लसही वर्षातून एकदा द्यावी.

हे ही पाहा : शेतीच्या वाटणीतील लहान भावाला पहिला हक्क मिळतो का?

लसीकरणाचे महत्त्व:

Animal health आजार झाले की उपचारांवर खर्च करणे खूप महाग होऊ शकते. म्हणूनच, हे आजार होऊच नयेत यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. जनावरांचं प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत असलेल्या यशस्वी पद्धतीमुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.

हे ही पाहा : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत: 733 कोटी रुपयांचा निधी वितरित

WhatsApp Channel Follow
Telegram Group Join Now

Leave a Comment